बेळगाव : जर्मनी येथील वारेंड्रॉफ येथे सीआएसएम मार्शल आर्ट विश्व सेनादल कुस्ती स्पर्धेत भारतीय नौदलाचे हवालदार मोहित व हवालदार दिनेश या दोन मल्लानी कास्यपदकांची कमाई केली आहे. वारेंड्रॉफ येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत 65 किलो वजनी फ्रिस्टाईल कुस्तीमध्ये हवालदार मोहित यांनी पहिल्या फेरीत पोलंडच्या डॅनियलचा 20-12 अशा गुण फरकाने पराभव केला. तुर्कीच्या दुमानकडून मोहितला अटीतटीच्या लढतीत 9-8 अशा गुण फरकाने पराभव पत्करावा लागला. पण उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या कामजात याने मोहितला 8-6 अशा गुण फरकाने पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. कांस्यपदकच्या लढतीत मोहितने कझाकीस्तानच्या उस्मानचा पराभव करून कांस्यपदक पटकाविले.
हवालदार दिनेश याने एलटीयुच्या रोमासचा बायफॉल्ट 10-0 असा पराभव केला. उपांत्य फेरीत मात्र दिनेशला युक्रेनच्या कोचनावकडून बायफॉल्ट 0-10 असा पराभव पत्करावा लागला. अंतिम फेरीत धडक मारण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. मात्र कांस्यपदकाच्या लढती हवालदार दिनेश अल्जेरियाच्या हिमाजाला 5-4 अशा गुण फरकाने पराभव करीत कांस्यपदक पटकाविले. नौदलचा शुभम याने 57 किलो फिस्टाईल कुस्ती स्पर्धेत पहिल्या सामन्यात इथोनियाच्या अल्बर्टचा बायफॉल्ट 10-0 असा पराभव केला. तर उपांत्य फेरीत इटलीच्या इवानोस्कीचा 3-1 असा पराभव करून अंतिम फेरीत मजल मारली. अंतिम फेरीत मात्र जर्मनीच्या होस्टनकडून 4-7 असा पराभव पत्करावा लागला. त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. वरील सर्व कुस्तीपटूंना बेळगावचे व सेनादलाचे कुस्ती प्रशिक्षक विनायक दळवी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









