बेळगाव : फिनिक्स स्कूल आयोजित फिनिक्स फाऊंडर विक निमित्त 17 व्या फिनिक्स चषक आंतर शालेय 17 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेला शनिवार दि. 28 पासून फिनिक्स होनगा मैदानावर प्रारंभ होत आहे. सदर स्पर्धेत 15 संघानी भाग घेतला आहे. शनिवार दि. 28 रोजी उद्घाटनाचा सामना सेंट झेवियर्स विरुद्ध अंगडी यांच्यात सकाळी 9 वा., दुसरा सामना एमव्हीएम विरुद्ध विजय यांच्यात 10 वा., तिसरा कनक मेमोरियल विरुद्ध भातकांडे यांच्यात 11 वा., चौथा सामना सेंटपॉल्स विरुद्ध कॅन्टोन्मेंट यांच्यात 11.45 वा., पाचवा सामना इस्लामिया विरुद्ध शेख सेंट्रल यांच्या 12.30 वा. खेळविण्यात येणार आहे.
29 रोजी झेवियर्स विरुद्ध ज्योती सेंट्रल यांच्यात सकाळी 9 वा, दुसरा सामना एमव्हीएम विरुद्ध भरतेश यांच्यात 9.45 वा, तिसरा सामना कनक मेमोरियल विरुद्ध मराठी विद्यानिकेतन यांच्यात 11 वा., चौथा सामना सेंटपॉल्स विरुद्ध केएलएस 11.45 वा. तर पाचवा सामना इस्लामिया वि. फिनिक्स यांच्यात दु. 12.30 वा., सोमवार दि. 30 रोजी पहिला सामना अंगडी वि. ज्योती सेंट्रल सकाळी 9 वा., दुसरा सामना विजया वि. भरतेश यांच्यात 9.45 वा, तिसरा सामना भातकांडे वि. मराठी विद्यानिकेतन यांच्या 11 वा, चौथा सामना केएलएस वि. कॅन्टोन्मेंट 11.45 वा. तर पाचवा सामना शेख सेंट्रल वि. फिनिक्स यांच्यात दु. 12.30 वा.
17 वर्षाखालील मुलींच्या स्पर्धा रविवार दि. 29 रोजी प्रारंभ होत असून या स्पर्धेत सहा मुलींच्या संघानी भाग घेतला. त्यात सेंट झेवियर्स, मराठी विद्यानिकेतन, सेंट जोसेफ, तर संतिबस्तवाड, फिनिक्स व विजया या संघांचा समावेश आहे. शनिवारी उद्घाटनाचा सामना झेवियर्स वि. मराठी विद्यानिकेतन दु. 1 वा., दुसरा सामना संतिबस्तवाड वि. फिनिक्स यांच्यात दुपारी 2 वा. खेळविण्यात येणार आहे. सोमवारी मराठी विद्यानिकेतन वि. सेंट जोसेफ यांच्यात दु. 12 वा., फिनिक्स वि. विजया यांच्यात 12.30 वा. होईल. मंगळवार दि. 1 जुलैला पहिला सामना झेवियर्स वि. सेंट जोसेफ दु. 1 वा. तर दुसरा सामना संतिबस्तवाड वि. विजया यांच्यात 2 वा. खेळविण्यात येणार आहे.









