बेळगावच्या श्रेया पोटे, मानसी मोरे यांची चमक
बेळगाव : बेंगळूर येथे आरआरसीसी महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत बेळगावच्या सिक्स क्रिकेट अकादमीने कपिल क्रिकेट अकादमीचा 109 धावांनी पराभव केला. बेळगावच्या श्रेया पोटे व मानसी मोरे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडविले. बेंगळूर येथे सुरु असलेल्या आरआरसीसी महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत सिक्स क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 30 षटकात 3 गडी बाद 296 धावा केल्या. त्यात बेळगावच्या श्रेया पोटेने 13 चौकाराच्या मदतीने 52 चेंडूत 78 धावा, हर्षिता के. ने 12 चौकारासह नाबाद 82, बेळगावच्या मानसी मोरे 7 चौकारासह 48 तर अवनीने 2 चौकारासह नाबाद 47 धावा केल्या. कपिल स्पोर्टसतर्फे श्रेयाने 2 तर लिविक्षाने एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना कपिल स्पोर्ट्स अकादमीचा डाव 30 षटकात सर्व गडीबाद 185 धावात आटोपला. त्यात मायराने 6 चौकारासह 89 चेंडूत 100 धावा करून शतक झळकविले. तिला प्रांजल मनोतने 19 तर सृष्टी शेट्टीने 11 धावा केल्या. सिक्स संघातर्फे अवनीने 2, रक्षिता व अनन्या यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.









