वृत्तसंस्था/नवी दिल्ली
इंडोनेशियातील सोलो येथे 18 ते 27 जुलै दरम्यान होणाऱ्या आशियाई कनिष्ट बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी अखिल भारतीय बॅडमिंटन फेडरेशनने 19 सदस्यांचा भारतीय संघ जाहीर केला असून त्यामध्ये तन्वी शर्माचा समावेश करण्यात आला आहे. तन्वी शर्माने यापूर्वी झालेल्या आशियाई महिलांच्या सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. या संघामध्ये भार्गवराम अरिगेला आणि विश्वतेज गिबरु हे पुरुष दुहेरीत भारताचे प्रतिनिधीत्व करतील. ही सांघिक स्पर्धा 18 ते 22 जुलै दरम्यान तसेच वैयक्तिक स्पर्धा 23 ते 27 जुलै दरम्यान होणार आहे.
भारतीय बॅडमिंटन संघ : पुरुष एकेरी- अनिश नेगी, एल. हेमार, रोनक चौहान, एन. प्रणव राम, महिला एकेरी- रुजुला रामू, तन्वी शर्मा, तन्वी रेड्डी, अंदलुरी, व्हिनेला के., पुरुष दुहेरी-भव्य छाबरा, पी. चौधरी, भार्गवराम अरिगेला, विश्वतेज गोबरु, महिला दुहेरी- व्हिनेला के., रसिका, गायत्री रावत, मानसा रावत, मिश्र दुहेरी- विष्णू केदार कोडे, कीर्ती मंचला, सी. लालरामसांगा आणि टी. सुरी









