वृत्तसंस्था/नवी दिल्ली
हिंदी महासागरात त्सुनामी आणि भूकंपविषयक अर्ली अलर्ट सिस्टीम भारत तयार करणार आहे. यासाठी समुद्रात 275 किलोमीटर लांब केबल टाकली जाणार आहे. ही सिस्टीम समुद्रात होणाऱ्या भूकंपीय हालचाली अणि अन्य धोक्यांचा शोध लावण्याच्या वर्तमान पद्धतीला बदलू शकते. हा प्रकल्प सध्या ‘रिक्वेस्ट फॉर प्रपोजल’च्या टप्प्यात आहे आणि तो हैदराबाद येथील भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र (आयएनसीओआयएस) संचालित करतेय. या पुढाकाराचा उद्देश वर्तमान अलर्ट सिस्टीमच्या मर्यादांवर मात करत याला अधिक स्मार्ट अन् विश्वसनीय करणे आहे. सध्याची सिस्टीम मुख्यत्वे समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या ब्युयॉजवर निर्भर आहे.
मॉनिटरिंगसाठी सेंसर
या केबलला अंदमान बेटसमुहापासून भूकंपासाठी सक्रीय अंदमान-निकोबार सबडक्शन झोनपर्यंत (जेथे दोन टेक्टॉनिक प्लेट्सची टक्कर होते) जवळपास 2500 मीटर खोलवर टाकले जाणार आहे. या केबलमध्ये बॉटम प्रेशर रिकॉर्डर, सीस्मोमीटर, टिल्ट मीटर आणि हायड्रोफोन यासारखे अनेक प्रकारचे सेंसर असतील, जे समुद्रात होणारे भूकंप आणि अन्य धोक्यांचे रियल टाइम मॉनिटरिंग करतील. ही सिस्टीम दीर्घकाळापर्यंत डाटा एकत्र करण्यास मदत करेल. तसेच हवामान संशोधन आणि वादळी लाटांच्या अर्ली अलर्ट सिस्टीमच्या उद्देशांच्या अध्ययनात सहाय्य करणार आहे.
नवी सिस्टीम अधिक विश्वसनीय
सध्या या क्षेत्रात देखरेख ब्युयॉजद्वारे होते, ज्यात बॉटम प्रेशर रिकॉर्डर आणि पृष्ठभागीय ब्युयॉज असतात. परंतु हे ब्युयॉज पर्यावरणाच्या वेगवेगळ्या परिस्थितींबद्दल संवेदनशील असतात आणि त्यांची देखभाल कठिण असते. नवी सिस्टीम अधिक विश्वसनीय असेल आणि हाय-बँडविड्थयुक्त भूकंपाचे आकडे थेट किनारी स्थानकांपर्यंत पोहोचतील अशी माहिती आयएनसीओआयएसचे संचालक टी.एमे. बालकृष्णन नायर यांनी दिली.
सबडक्शन झोन
अंदमान-निकोबार सबडक्शन झोनमध्ये टेक्टॉनिक स्वरुपात सक्रीय भारतीय प्लेट, यूरेयिन प्लेटच्या खाली दाबली जाते. हे क्षेत्र ऐतिहासिक स्वरुपात भूकंपीय हालचालींचे केंद्र राहिले आहे. 2004 साली अंदमान-सुमात्रा भूकंपादरम्यान या भागाच्या उत्तर-पश्चिम हिस्स्यात लांब-रुंद भेग पडली होती, यामुळे विनाशकारी त्सुनामी आली होती.
समर्पित स्थानकाची होणार निर्मिती
अर्ली अलर्ट सिस्टीम बसविण्याच्या योजनेच्या अंतर्गत अंदमान बेटसमुहात एक समर्पित स्थानकही तयार केले जाईल. जे पुढील काळात प्रादेशिक त्सुनामी सर्व्हिस सेंटरच्या स्वरुपात विकसित केले जाऊ शकते, कारण हा बेटसमूह त्सुनामीच्या दृष्टीकोनातून अत्यंत संवेदनशील आहे. ही केबल हैदराबाद येथील डाटा प्रोसेसिंग सेंटरशी कनेक्टेड असणार आहे.









