रत्नागिरी :
तालुक्यातील नाणीज येथे मोबाईलमधील खेळाची सवय लागून नैराश्य आल्याने महाविद्यालयीन युवकाने गळफास घेत आत्महत्या केल़ी ही घटना मंगळवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडल़ी रवींद्र राजेंद्र बेंद्रे (17, ऱा नाणीज, मूळ नेवासा जि. अहिल्यानगर) असे मृत युवकाचे नाव आह़े या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसात करण्यात आली आह़े
रवींद्र हा मूळचा अहिल्यानगर जिह्यातील नेवासा येथील रहिवासी आह़े तो काही दिवसापूर्वी नाणीज येथे मामा विकास पोपट यांच्याकडे वास्तव्यासाठी आला होत़ा तसेच त्याने नाणीज येथील महाविद्यालयात प्रवेशही घेतला होत़ा रवींद्र याला मोबाईलमध्ये गेम खेळण्याची सवय लागली होती. मोबाईलची सवय सुटत नसल्याने तो सातत्याने बैचेन राहत होत़ा यामुळे रवींद्र याला एकप्रकारे नैराश्य आले होत़े यातूनच 24 जून रोजी रवींद्रने राहत्या खोलीच्या लोखंडी बारला टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल़ी रवींद्रचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह पाहून नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी पाली येथील ग्रामीण ऊग्णालयात दाखल केल़े या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी रवींद्र याला मृत घोषित केल़े या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आह़े








