बेळगाव : कॅम्पमधील सेंट अॅन्थोनी शाळेच्या सभागृहात बेळगाव जिल्हा सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने आयोजित बेळगाव शहर प्राथमिक व माध्यमिक क्रीडा शिक्षकांच्या बैठकीत शहराच्या पीईओ जहिदा पटेल यांनी आगामी 2025-26 शैक्षणिक वर्षाच्या क्रीडा स्पर्धा आयोजकांची नावे जाहीर केली. या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून शहराच्या पीईओ जहिदा पटेल, जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर पी वंटगुडी, शहराध्यक्ष हणमंत मास्तीहोळी, अनिल कांबळे, एल बी नाईक, पी जी खोत, ग्रेसी कडकडा, व्यासपीठावर उपस्थित होते.
जहिदा पटेल यांनी आगामीवषी होणाऱ्या स्पर्धा आयोजकांची नावे जाहीर केली. यात प्राथमिक क्लस्टर विभागात गांधीनगर क्लस्टर, दिशा इंग्रजी माध्यम स्कूल कणबर्गी, फुलबाग गल्ली-चव्हाट गल्ली क्लस्टर, मराठी विद्यानिकेतन पॅम्प, वडगाव खासबाग क्लस्टर, डी टी देसाई स्कूल टिळकवाडी, अनगोळ, शहापूर क्लस्टर-स्वाध्याय विद्यामंदिर टिळकवाडी, तर माध्यमिक विभागात टिळकवाडी विभाग गोमटेश हायस्कूल मजगांव, महांतेशनगर विभाग लिटल स्कॉलर ऑटोनगर, नेहरूनगर विभाग सिद्धरामेश्वर स्कूल, शहापूर विभाग बी के मॉडेल स्कूल, पॅम्प विभाग सेंटपॉल स्कूल या शाळांकडे यंदाच्या स्पर्धा आयोजनाचे यजमानपद देण्यात आले आहे.
तसेच शहरातील सर्व शाळांनी क्रीडानिधी 30 जुलैच्या आत भरून त्याची पावती बीईओ ऑफिस कार्यालयात जाहिदा पटेल यांच्याकडे जमा करावयाची आहे. या बैठकीत आगामी स्पर्धा सुरळीत पार पडण्यासाठी सर्व क्रीडा शिक्षकांनी सहकार्य करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच शालेय आवारात स्वच्छता व रक्तदान शिबिर व हृदयरोग विद्यार्थ्यांची तपासणी यंदा शिक्षण खात्याच्यावतीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हणमंत मास्तीहोळी यांनी क्रीडा शिक्षकांनी क्रिया योजना, पाठ योजना व आपल्या वार्षिक नियोजनाबाबत करावयाच्या दक्षता याबद्दल त्यांनी सांगितले.
क्रीडा शिक्षक नागराज भगवंतण्णावर यांनी मागील वषी आयोजन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व राज्य व विभागीय स्पर्धेसाठी खेळून आलेल्या खेळाडूंच्या टीएडीए उशिरा दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली व पुढील स्पर्धा सुरळीत पार पडण्यासाठी शिक्षण खात्यानेही सहकार्य करण्यासाठी आवाहन केले. या बैठकीला शहरातील प्राथमिक व माध्यमिक विभागातील मुख्याध्यापक क्रीडाशिक्षक बापू देसाई, सचिन कुडची, जयसिंग धनाजी, प्रवीण पाटील, अर्जुन भेकणे, दत्ता पाटील, प्रकाश बजंत्री ,चेस्टर रोजारियो, देवेंद्र कुडची, सी आर पाटील उमेश बेळगुंदकर, उमेश मजुकर, रामलिंग परीट, संतोष दळवी, अॅन्थोनी डिसोजा, सुनिता जाधवसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.









