वृत्तसंस्था / बर्लिन
डब्ल्यूटीए टूरवरील येथे झालेल्या बर्लिन खुल्या ग्रासकोर्ट महिलांच्या टेनिस स्पर्धेत झेकच्या 25 वर्षीय मर्केटा व्होंड्रोसोव्हाने एकेरीचे जेतेपद मिळविताना चीनच्या वेंग झीनयुचा अंतिम सामन्यात पराभव केला.
दोन वर्षांच्या कालावधीनंतर व्होंड्रोसोव्हाचे हे पहिले जेतेपद आहे. 2023 साली मर्केटा व्होंड्रोसोव्हाने विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर दुखापतीमुळे तिला जवळपास वर्षभर टेनिसपासून अलिप्त रहावे लागले होते. अंतिम सामन्यात व्होंड्रोसोव्हाने झिनयुचा 7-6 (10-8), 4-6, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव केला. हा अंतिम सामना सुमारे तीन तास चालला होता.









