वृत्तसंस्था/ हॅले (जर्मनी)
एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय हॅले खुल्या टेनिस स्पर्धेत रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेवने स्थानिक व्हेरेवचा पराभव करत एकेरीची अंतिम फेरी गाठली.
पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मेदव्हेदेवने व्हेरेवचा 7-6 (7-3), 6-7 (1-7), 6-4 असा पराभव केला. हा सामना जवळपास 3 तास चालला होता. अलिकडच्या कालावधीतील मेदव्हेदेवचा व्हेरेववरील हा सलग चौथा विजय आहे. आता मेदव्हेदेव आणि बुबलिक यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. बुबलिकने उपांत्य लढतीत इटलीच्या टॉप सिडेड जेनिक सिनेरला पराभवाचा धक्का दिला आहे.









