विवाहानंतर बदलले स्वत:चे आडनाव
काही लोकांमध्ये विवाहाची मोठी क्रेझ असते, ते स्वत:साठी परफेक्ट पार्टनरचा शोध घेत असतात. एका अशाच महिलेने आता आयफेल टॉवरसोबतच विवाह केला होता. 2007 मध्ये अमेरिकेतील एरिका लॅबरी नावाची महिला स्वत:च्या अजब छंदामुळे चर्चेत आली होती. तिने थक्क करणारा विवाह केला होता.
या महिलेने पॅरिस येथील आयफेल टॉवरशीच विवाह केला होता, ती भावनात्मक स्वरुपात वेगवेगळ्या वस्तूंबद्दल आकर्षित होते. पॅरिस येथे गेल्यावर तिला आयफेल टॉवरवर प्रेम झाले आणि तिने या टॉवरसोबत विवाह केला. आयफेल टॉवरसोबत तिचे नाते अत्यंत दृढ झाले होते.
महिलेने आयफेल टॉवरसोबत विवाहानंतर स्वत:चे नाव बदलून एरिका टॉवर केले होते. 15 वर्षांपर्यंत ती आयफेल टॉवरसोबतच विवाहबंधनात होती. 15 वर्षांनी तिला एका नव्या वस्तूवर प्रेम जडले. आयफेल टॉवरसोबत 15 वर्षे घालविल्यावर माझे जीवन नीरस झाले होते. याचमुळे मी जुन्या जोडीदाराला सोडून नव्याचा शोध घेत होते. मग माझा शोध फेंसद्वारे पूर्ण झाल्याचे तिने म्हटले आहे. तिने स्वत:ची प्रेमकहाणी सोशल मीडियावरही शेअर केली आहे.









