वृत्तसंस्था/ जालंधर
जालंधर कॅन्ट स्टेशन परिसरात शनिवारी सकाळी 11:30 वाजता पार्किंगमध्ये मोबाईल क्रेन कोसळून मोठा अपघात झाला. पॉवर क्रेनद्वारे काम सुरू असताना एका बाजूला वाढलेल्या वजनामुळे ती कोसळली. क्रेनचा वरील भाग पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या प्रवाशांच्या आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर पडल्यामुळे एका कारसह सुमारे 20 दुचाकींचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेदरम्यान प्रवाशांच्या सुविधेसाठी ठेवण्यात आलेल्या कंटेनर शौचालयांचेही नुकसान झाले. क्रेन कोसळल्याचा आवाज येताच आजुबाजुचे लोक घाबरलेले दिसून येत होते.









