प्रतिनिधी/ बेळगाव
शहर देवस्थान मंडळातर्फे सालाबादप्रमाणे पावसाच्या मागणीसाठी लक्ष्मी टेक, पाईपलाईन रोड येथील श्री महालक्ष्मी मंदिरात गाऱ्हाणे घालण्यात आले. शहर देवस्की मंडळाच्यावतीने अध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील यांनी बेळगावमध्ये चांगला पाऊस होऊ दे, उदंड पीक येऊ दे, रोगराईपासून सर्वांचे रक्षण कर, असे गाऱ्हाणे श्री महालक्ष्मीचरणी घातले. हा कार्यक्रम भांदूर गल्ली कमिटीच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता.
बेळगाव तालुका आणि शहरात समाधानकारक पाऊस व्हावा, बळीराजा सुखी व्हावा, रोगराईपासून पिकांचे तसेच नागरिकांचे रक्षण व्हावे. या मागणीसाठी पंच कमिटीच्यावतीने गेल्या 20 वर्षांपासून लक्ष्मी देवीला गाऱ्हाणे घालण्यात येत आहेत. यंदा देखील दरवर्षीप्रमाणे देवस्की पंचमंडळ आणि भक्तांच्या उपस्थितीत विधीवत पूजा-अर्चा केल्यानंतर गाऱ्हाणे घालण्यात आले. यानंतर उपस्थित भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी माजी महापौर मालोजी अष्टेकर, गणपत चौगुले, फकिरा चौगुले, विठ्ठल पाटील, महादेव चौगुले, आप्पा निलजकर, श्रमिक पाटील, रतन जुवेकर, संपत निलजकर, गणेश सांगावकर यांच्यासह महिला व भाविक उपस्थित होते.









