प्रतिनिधी/ बेळगाव
गांधीनगर ब्रिजजवळील सेवा रस्त्याची दाणादाण उडाली असून गांधीनगर ते सांबऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत असून खड्ड्यायातून प्रवास करताना अवजड वाहने धिम्म्यागतीने ये-जा करीत आहेत. परिणामी याठिकाणी वाहतूक कोंडी होत असून चाळण बनलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.
मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहर व उपनगरातील डांबरी रस्त्यांची दयनीय अवस्था बनली आहे. डांबर उखडून रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्याने रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यायांमध्ये पावसाचे पाणी तुंबत असल्याने खड्ड्याचा अंदाज येणे कठीण झाले आहे. गांधीनगर ते सांबऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था बनली आहे. गांधीनगर ओव्हरब्रिज येथील सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्यात खड्डे आहेत की खड्डेयात रस्ता हे समजणे देखील आता नागरिकांना कठीण झाले आहे. हा रस्ता रहदारीचा असून दररोजा हजारो वाहने या मार्गावरुन ये-जा करतात. बेळगाव-बागलकोट आणि बैलहोंगलकडे जाणाऱ्या वाहनांची कायम वर्दळ असते. लहान वाहनांसह अवजड वाहने ये-जा करत असल्याने रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. दरवर्षी गांधीनगर ब्रिजच्या खाली गुडघाभर पावसाचे पाणी तुंबत असते. तशातूनच वाहन चालक आपली वाहने हाकून पाण्यातूनच वाट शोधतात. गेल्या 15 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने डांबरी रस्ता उखडला आहे. सांबऱ्याकडून येणारे त्याचबरोबर बेळगावकडून सांबऱ्याकडे जाणारी अवजड वाहने ब्रिजच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांचा वेग कमी होत आहे. खड्ड्यायातून पुढे जाताना वाहने हळू जात असल्याने याठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. त्याचबरोबर खड्ड्यायामध्ये पावसाचे पाणी तुंबल्याने खड्ड्यायांचा अंदाज येणे अवघड झाले आहे. परिणामी दिवसा तसेच रात्रीच्यावेळी लहान-मोठे अपघात होत आहेत. तसेच वाहने नादुरुस्त होण्याच प्रमाण वाढले आहे. या ख•dयांची केवळ तात्पुरती डागडुजी न करता या मार्गावर काँक्रिटीकरण करण्यात यावे. जेणेकरून दरवर्षाची समस्या मार्गी लागेल, असे मत जाणकारांतून व्यक्त केले जात आहे. महापालिका किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे लक्ष घालून हा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावावा, अशी मागणी केली जात आहे.









