2022 मध्ये प्रदर्शित लव ट्राएंगल ड्रामा ‘द समर आय टर्न्ड प्रिटी’च्या पहिल्या सीझनने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. हा मल्टीजनरेशनल ड्रामा बेली कोंकलिनच्या आयुष्याच्या अवतीभवती घुटमळणार असून जी एकाचवेळी दोन भावांवर प्रेम करू लागते. या सीरिजचे दोन सीझन यशस्वी ठरले असून आता निर्मात्यांनी याच्या तिसऱ्या सीझनची घोषणा केली आहे.
यावेळी ‘द समर आय टर्न्ड प्रिटी’ची कहाणी मैत्री, प्रेम आणि कौटुंबिक बंधासह पुढे जाणार आहे. तिसऱ्या सीझनमध्ये यावेळी लोला लुंग, क्रिस्टोफर ब्रिनी, गेविन कॅसलेग्नो, जॅकी चुंग, सीन कॉफमॅन, रेन स्पेंसर, लिली डोनॉग्यू, सोफिया ब्रायंट, जो डे ग्रँड मॅसन, टान्नर जगारिनो आणि एम्मा इश्ता यासारखे कलाकार दिसून येतील. तिसऱ्या सीझनचे दिग्दर्शन जेनी हन यांनी केले आहे.
अमेझॉन एजीएम स्टुडिओच्या बॅनरखाली निर्मित लव्ह ट्राएंगल ‘द समर आय टर्न्ड प्रिटीचा हा अखेरचा सीझन असून तो 17 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. अमेझॉन प्राइम व्हिडिओवर तो प्रसारित होणार आहे.









