पोलिसांकडून मातेचा कसून शोध सुरू ; आंब्याच्या बागेत सापडले अर्भक
मालवण/प्रतिनिधी
मालवण कुंभारमाठ येथील एका आंब्याच्या बागेत स्त्री जातीचे एक नवजात अर्भक सापडून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांना तात्काळ माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सदरचे अर्भक मालवण ग्रामीण रुग्णालयात आणून त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत . सदर अर्भकाच्या मातेचा शोध घेण्याचे काम पोलीस यंत्रणेकडून सुरू करण्यात आले आहे.









