वृत्तसंस्था / युट्रेच (नेदरलँड्स)
भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाचा युरोप दौऱ्याचा शेवट पराभवाने झाला. या दौऱ्यामध्ये भारतीय महिला हॉकी संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली. या दौऱ्यामध्ये भारताला चार सलग सामने गमवावे लागले.
या दौऱ्यामध्ये बेल्जियमने तीन सामन्यांत भारताचा पराभव केला. तर चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून त्यांना हार पत्करावी लागली. या दौऱ्यातील शेवटच्या सामन्यात यजमान नेदरलँड्सने भारताचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-2 असा पराभव केला. या सामन्यात निर्धारित वेळेत गोलफलक कोराच होता. येत्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या कनिष्ट महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी सरावाकरिता युरोपचा हा दौरा आयोजित केला होता.









