मिरज :
राहूल गांधी आणि संजय राऊत हे केवळ प्रश्न उपस्थित करुन पळून जाणारे नेते आहेत. त्यामुळे अशांच्या प्रश्नांना उत्तर देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वारस्य नसते. त्यासाठी भाजपामध्ये अनेक सक्षम नेते कार्यरत आहेत, असे सांगताना कोरोना कालावधीत शरद पवार यांनी सपत्नीक थाळीनाद केला होता. पण नंतर त्यांनी विरोधी सूर आळविला, असा आरोप उच्च शिक्षणमंत्री तथा जिह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
केंद्रात मोदी शासनाला 11 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या कालावधीत झालेल्या विकास कामांबाबत पालकमंत्री प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक, मकरंद देशपांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जनतेला पायाभूत सुविधा उपलब्ध कऊन देण्याबरोबर दहशतवाद आणि नक्षलवाद संपविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असल्याचा उल्लेखही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला. पाकिस्तान विऊध्द केलेल्या ‘सिंदूर ऑपरेशन’मुळे देशातील सर्वच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या सूरात सुर घालत त्याचे जोरदार समर्थन केले असल्याचे ते म्हणाले.
2047 साली भारत महासत्ता होणारच. त्यादिशेने सध्याची मोदी सरकारची पाऊले पडत आहेत, असे सांगताना मोदी सरकारच्या प्रत्येक योजनांमध्ये जनसामान्यांचे कसे कल्याण झाले आहे? याचा आवर्जून उल्लेख करण्यात आला. ऑपरेशन सिंदूर, देशातील दहशतवाद आणि नक्षलवाद संपुष्टात आणणे, संरक्षण क्षेत्रात झालेली प्रगती, युध्द आणि नैसर्गिक आपत्तीचा सक्षमपणे करण्यात आलेला सामना, कोविड आणि इतर अनेक संकटप्रसंगी वंदे भारत मिशन राबवून परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांना दिलेले संरक्षण, नक्षलवादी मुक्त झालेले 96 जिल्हे, भ्रष्टाचाराला घालण्यात आलेला आळा, पंतप्रधान जनधन योजनेतून 55.22 कोटी लोकांची उघडलेली बँक खाती, उत्पन्नामध्ये करमुक्त दिलेली सवलत, देशात अस्तित्वात आलेले नवे रस्ते, पुल, बोगदे, विमानतळ, हवाईमार्ग, रेल्वे, बंदरे अशा अनेक योजनांची माहिती यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली.
राहूल गांधी आणि संजय राऊतसारख्या विरोधकांना हा विकास दिसत नाही. ते केवळ प्रश्न उपस्थित कऊन त्याच्या उत्तराची वाट न पाहता पळून जाणारे नेते आहेत. आाणि अशातही त्यांची पंतप्रधान मोदी यांनी उत्तर द्यावे, अशी अपेक्षा असते. पण त्यांना उत्तर देण्यासाठी भाजपामध्ये अनेक सक्षम नेते कार्यरत आहेत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. केवळ विरोधी बोलणे एवढेच यांचे काम आहे. कोरोना कालावधीत पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला साथ देत कोट्यावधी जनतेने थाळीनाद केला होता. खुद्द शरद पवार पती-पत्नी या थाळीनादात सहभाग होते. पण नंतर त्यांनीही विरोधी सूर आळविला, असा आरोपही केला.
सध्या देश प्रगतीच्या दिशेकडे वेगाने झेपावत आहे. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत 40.71 कोटी आरोग्य विमा कार्ड तयार करण्यात आले असून, नऊ कोटींहून अधिक लोकांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. 17 हजार, 750 हून अधिक ग्रामीण आरोग्य केंद्रे सुरू कऊन दुर्गम भागातील वंचितांनाही आरोग्यसेवा मिळवून देण्यात आली आहे. इशान्येकडील राज्यात केंद्र शासनाने 44 हजार, 859 कोटी पेक्षा अधिक रक्कमेच्या तीन हजार, 613 विकास योजनांना मंजूरी दिली आहे. महिलांना सैनिक शाळांमध्ये आणि राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. याशिवाय याच शासनाने काशी विश्वनाथ कॉरिडॉर, महाकाल परियोजना, राम मंदिरची निर्मिती कऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसंबंधीत पाच ठिकाणांचा पंचतिर्थ म्हणून विकास केला आहे. असे अनेक लोकोपयोगी कामे या कालावधीत झाल्याचा दावाही त्यांनी केला.
- शिवाजी रस्त्याच्या कामाची चौकशी करु
मिरज शहरात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या कामास निधी उपलब्ध कऊन दिला. काम गतीने व्हावे, यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. तरीही विलंब होत असेल तर संबंधीत ठेकेदाराची चौकशी कऊन रस्त्याच्या पूर्णत्वासाठी अल्पावधीतच योग्य तो निर्णय घेऊ, अशी हमी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. आजच्या पालकमंत्र्यांच्या या दौऱ्यात माजी पालकमंत्री, आमदार सुरेश खाडे, ज्येष्ठ नेते सुरेशबापू आवटी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची अनुपस्थिती मात्र प्रकर्षाने जाणवली.








