वृत्तसंस्था /नवी दिल्ली
शारजात येत्या सप्टेंबर महिन्यात नेपाळ आणि विंडीज यांच्यात तीन सामन्यांची टी-20 द्विपक्षीय पहिली क्रिकेट मालिका खेळविली जाणार आहे. सदर मालिका त्रयस्त ठिकाणी खेळविली जाणार असली तरी नेपाळ या मालिकेचे अधिकृत यजमान आहे.
विंडीज आणि नेपाळ क्रिकेट मंडळ यांच्यात झालेल्या चर्चेनंतरच ही द्विपक्षीय मालिका निश्चित करण्यात आली.क्रिकेटचा प्रसार जागतिक स्तरावर होण्याच्या दृष्टिकोनातून जोरदार प्रयत्न आयसीसीतर्फे सुरू आहे. सदर मालिकेला 27 सप्टेंबरपासून शारजात प्रारंभ होईल. या मालिकेतील पहिला सामना 27 सप्टेंबरला, दुसरा सामना 28 सप्टेंबरला तर तिसरा सामना 30 सप्टेंबरला खेळविला जाईल. शारजातील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हे सर्व सामने होतील. नेपाळ आणि संयुक्त अरब अमिरात क्रिकेट मंडळांच्या संयुक्त यजमान पदाने ही द्विपक्षीय मालिका होत आहे.









