वृत्तसंस्था / बेकेनहॅम (ब्रिटन)
भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख प्रशिक्षक गौतम गंभीरचे काही कौटुंबिक समस्येमुळे शुक्रवारी मायदेशी आगमन झाले. सदर माहिती बीसीसीआयच्या प्रवक्त्याने दिली. गौतम गंभीरच्या आईची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती खालवल्याने गंभीरने तातडीने मायी देशी येण्याचा निर्णय घेतला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून पहिल्या सामन्याला लिड्स येथे 20 जूनपासून प्रारंभ होत आहे. गंभीरच्या गैरहजेरीत आता संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रेयान डुश्चेटी भारतीय संघाला मार्गदर्शन करतील. भारतीय संघाचा चार दिवसांचा सरावाचा सामना शुक्रवारपासून सुरू झाला असून या सामन्यात डुश्चेटी यांच्याकडून खेळाडूंना मार्गदर्शन केले जाईल. त्याच प्रमाणे गोलंदाज प्रशिक्षक मॉर्नी मॉर्कल, फलंदाज प्रशिक्षक सितांशु कोटक यांचे डुश्चेटीला साथ राहिल. गौतम गंभीर पुढील आठवड्यात पुन्हा इंग्लंडमध्ये दाखल होईल, असे समजते.









