समुद्राचा शिकारी असे मिळाले नाव
समुद्राच्या खोलवर अनेक रहस्य दडलेली असुन त्याविषयी फारशी माहिती नसते. वैज्ञानिकांनी आता एका अशा जीवाविषयी शोध लावला आहे, जो अत्यंत रहस्यमय आहे. याच्याशी निगडित अध्ययन अलिकडेच रॉयल सोसायटी ओपन सायन्समध्ये प्रकाशित झाले आहे. संशोधनानुसार जीवाश्म वैज्ञानिकांनी 50 कोटी वर्षांपूर्वी समुद्राच्या आत तीन डोळ्यांचा एक असा शिकारी जीव होता, ज्याचे काटेदार पंजे होते आणि तोंड दातांनी भरले होते हे शोधून काढले आहे. हा जीव एखाद्या राक्षसी जीवासारखा होता. पृथ्वीवर जीवसृष्टीची सुरुवात होत असताना हा प्राणी अस्तित्वात होता. या अनोख्या जीवाचे नाव मोसुरा फेंटोनी असून कॅनडाच्या रॉकी पर्वतांमध्ये बर्गेस शेलमध्ये तो मिळाला. मोसुरा काही मासा नव्हता, तर रेडियोडॉन्ट समुहाचा हिस्सा होता. हा समुह कॅम्ब्रियन काळातील क्रूर सागरी शिकारी होते. बर्गेस शेल 1980 पासून युनेस्कोकडून घोषित जागतिक वारसास्थळ आहे.
मोसुरा फेंटोनीचा चेहरा एखाद्या सायन्स-फिक्शन चित्रपटातील प्राण्यासारखा हात. याची लांबी केवळ एका बोटाइतकी होती, परंतु हा छोटा शिकारी अत्यंत धोकादायक होता. याच्या तीन डोळ्यांमध्ये नसांचे गुच्छ मिळाले असून ते आजच्या काळात आर्थ्रोपॉड्सप्रमाणे पाहणे आणि समजण्यास तरबेज होते. रॉयल आंsटारियो म्युझियमचे जीन-बनॉर्ड कॅरॉन यांनी या नसांद्वारे या जुन्या जीवाचे डोळे किती विकसित होते हे कळत असल्याचे उद्गार काढले आहेत.
याचे काटेदार पंजे छोट्या शिकारींना जखडून ठेवण्यासाठी होते आणि खालच्या बाजूने दातांनी भरलेले गोल तोंड अन्न चावण्यास मदत करत होते. याच्या शरीरात मोठमोठे फ्लॅप होते, जे पंखांप्रमाणे पोहण्यास मदत करत होते. याचमुळे याला सी मॉथ देखील म्हटले गेले आहे. याचे नाव जपानी चित्रपट मॉथ्राने प्रेरित असून तो एक विशाल कीडा आहे. हा जीव आता विलुप्त झाला असला तरीही याच्याशी संबंधित कीडे, खेकडे आणि मिलीपीड हे जीव अजून अस्तित्वात असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वात आश्चर्याची बाब याचे पोट होते, ज्यात 16 हिस्से होते, जे अन्य कुठल्याही रेडियोडॉन्टमध्ये दिसून आले नाहीत. हा हिस्सा आजच्या हॉर्सशू क्रॅब, वुडलाइस आणि कीड्यांशी मिळताजुळता आहे. हा शोध कॅम्ब्रियन काळातील सागरी जीव किती वेगळे होते हे सांगणार आहे. याला इवॉल्युशनरी कन्वर्जंस म्हटले जाते, जेथे वेगवेगळे जीव एकसारखी लक्षणे विकसित करतात असे मॅनिटोबा म्युझियमचे जो मोइसियुक यांनी म्हटले आहे. रॉयल ओंटारियो म्युझियमने मोसुराचे 61 जीवाश्म मिळविले आहेत.









