दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली जामीन याचिका
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्ली उच्च न्यायालयाने टेरर फंडिंग प्रकरणातील आरोपी फुटिरवादी नेता शब्बीर अहमद शाहला झटका देत जामीन याचिका गुरुवारी फेटाळली. यापूर्वी उच्च न्यायालयाने 28 मे रोजी शब्बीर शाहच्या जामीन याचिकेवर सुनावणी पूर्ण करत निर्णय राखून ठेवला होता. शब्बीर शाहचे वय 74 वर्षे असून तो 6 वर्षांपासून तुरुंगात आहे, तसेच त्याच्या विरोधात कुठलाही गुन्हा सिद्ध करत आला नसल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलाने सुनावणीदरम्यान केला होता. परंतु न्यायालयाने जामीन याचिका फेटाळली आहे. शब्बीर शाहला एनआयएने 4 जून 2019 रोजी टेरर फंडिंग प्रकरणी अटक केली होती. त्याच्यावर जम्मू-काश्मीरला फुटिरवाद अन् दहशतवादी कारवायांसाठी हवालाद्वारे निधी जमविल्याचा आरोप आहे. एनआयएने शब्बीर शाहवर पाकिस्तानातील दहशतवादी संघटना आणि त्यांचे म्होरके म्हणजच सैयद सलाउद्दीन, हाफिज सईद आणि इफ्तिखार हैदर राणाच्या संपर्कात असल्याचा आरोप केला आहे.









