वृत्तसंस्था/ अँटवेर्प (बेल्जियम)
युरोपच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाने आपल्या मोहिमेला विजयाने प्रारंभ केला आहे. रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात भारताने यजमान बेल्जियमचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला.
या सामन्यात 11 व्या मिनिटाला भारताचे खाते गीता यादवने उघडले. 25 व्या मिनिटाला मारी गोएन्सने बेल्जियमला बरोबरी साधून दिली. 34 व्या मिनिटाला. लूसी हॅकने बेल्जियमचा दुसरा गोल केला. सामन्याच्या मध्यांतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. 40 व्या मिनिटाला सोनमने शानदार गोल करुन भारताला बरोबरी साधून दिली. 45 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर ललीततुंगाईने भारताचा तिसरा आणि निर्णायक गोल नोंदविला. आता युरोपच्या दौऱ्यात भारतीय कनिष्ठ महिला संघाचा दुसरा सामना 10 जून रोजी बेल्जियम बरोबर होणार आहे.









