आपत्कालीन वेळी धावणार मदतीला
बेळगाव : भारतीय वायुदलाचे एएन-32 हे विमान बेळगावच्या सांबरा विमानतळावर यशस्वीरीत्या हाताळण्यात आले. एअरक्राफ्ट रेस्क्यू अॅण्ड फायर फायटिंग विभागाच्यावतीने विमान धावपट्टीवर उतरविण्यात आले. विशेषत: युद्धाच्यावेळी वापरले जाणारे हे विमान बेळगावमध्ये उतरविण्यात आल्याने याबाबत कमालीची चर्चा होती. बेळगावमध्ये एअरफोर्स ट्रेनिंग सेंटर असल्यामुळे या ठिकाणी अनेक युद्धावेळी वापरली जाणारी एअरक्राफ्ट उतरविली जातात. सोमवारी अशाच प्रकारचे एएन-32 हे युद्धविमान बेळगावमध्ये आणण्यात आले होते. यामुळे भविष्यात एखादी आपत्ती ओढवल्यास बेळगावमध्ये युद्धविमाने उतरविली जाऊ शकतात, याचा आत्मविश्वास अधिकाऱ्यांना मिळाला आहे.









