वृत्तसंस्था / नवी दिल्ली
इराणवर अमेरिकेने लादलेले निर्बंध मोडून त्या देशाशी आर्थिक व्यवहार केल्याच्या आरोपाचा भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी इन्कार केला आहे. त्यांच्या उद्योगसमूहानेही हे आरोप नाकारले आहेत. अदानी यांच्या उद्योगसमूहाने इराणचा नैसर्गिक इंधन वायू आयात केला आहे, असा आरोप अमेरिकेत केला गेल्यानंतर अदानी यांनी हा इन्कार प्रसिद्ध केला आहे.
अदानी यांनी इराणवर अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांच्या भंग केल्यासंबंधीचा अहवाल अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट जर्नल या नियतकालिकात प्रसिद्ध झाला होता. अमेरिकेच्या चौकशी यंत्रणांनी हा आरोप अदानी आणि त्यांच्या उद्योगसमूहावर ठेवला असल्याची माहिती या नियतकालिकाने प्रसिद्ध केली होती. अमेरिकेचा कायदा विभाग अदानी आणि इराण यांच्यातील कथित आर्थिक व्यवहारांसंबंधी पडताळणी करत आहे, असेही वृत्त या नियतकालिकाने प्रसिद्ध पेले आहे. इराणच्या कोणत्याही समुद्री मालवाहतुकीला आम्ही आमच्या बंदरांवर येण्यास अनुमती दिलेली नाही, असे स्पष्टीकरण अदानी समूहाने सोमवारी दिले आहे.









