रत्नागिरी :
कोकणाला निसर्गाने भरभरून दिले आहे. पर्यटनातून मोठ्या प्रमाणावर कोकणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत़. मात्र येथील शेतकरी रोजगारासाठी मोठ्या शहरांकडे जात आह़े हा शेतकरी आता बाहेर जाणार नाही आणि गेला तरी तो पुन्हा कोकणात आला पाहिजे, असा विकास भविष्यात घडवायचा आह़े आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो, तरीसुद्धा सर्वसामान्य कोकणवासियांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केल़े
स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यागृह येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सीएनजी घंटागाड्या लोकार्पण व शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यात आल़े यावेळी पालकमंत्री उदय सामंत, गृह आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, माजी आमदार रवींद्र पाठक, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, राजेंद्र महाडिक, बिपिन बंदरकर, परीक्षित यादव आदी उपस्थित होत़े
- लोकाभिमुख विकास प्रकल्प उभारले
रत्नागिरी जिह्यात लोकाभिमुख विकास प्रकल्प उभारण्यात आले आहेत़ दिलेला निधी विकासकामांना वापरा. कामाचा दर्जा चांगला ठेवा. तसेच वेळेमध्ये काम पूर्ण करा ही माफक अपेक्षा ठेऊनच मी सगळ्यांना निधी दिल़ा माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये जे निधीचं वाटप झालं ती कामे आज महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत. खऱ्या अर्थाने लोकाभिमुख विकास प्रकल्प आपण राबवले, असे शिंदे म्हणाले.
- लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पूर्ण करणारच
शेतकऱ्यांना सन्मान योजना, पीक विमा योजना त्याचबरोबर लेक लाडकी लखपती योजना, एसटीमध्ये सवलत योजना हे फक्त चुनावी जुमला नसून प्रत्यक्षात मदत करण्यात आली आह़े लाडक्या बहिणींना शब्द दिलेला आहे तो शब्द पूर्ण करणारच़ बाळासाहेब सांगायचे, शब्द देताना दहा वेळा नाही शंभरवेळा विचार करा. पण एकदा शब्द दिला की माघारी फिरणार नाही. लाडकी बहीण योजना आम्ही लागू केली. विरोधकानी कितीही आरोप केले तरीसुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाह़ी, अशी ग्वाही शिंदेनी दिली.
- शहरांप्रमाणे ग्रामीण भागाच्या विकासावर भर
आपण मुख्यमंत्री होतो त्यावेळी देवेंद्र फडणवीस व अजित पवार एक टीम म्हणून काम करत होत़ो आताही आम्ही टीम म्हणून काम करतोय़ सर्वसामान्य गोरगरिबांना न्याय देणारे हे सरकार आह़े राज्यात 50 टक्के नागरिकरण झालेले आह़े शहरांप्रमाणे ग्रामीण भागातदेखील विकास करणं हे आमच्या सरकारचं काम आह़े
- ग्रीनफिल्ड कोकणसाठी वरदान ठरणार
पावसाळी शेतीबरोबर आपल्याला पावसाच्या पाण्याचे नियोजन केले पाहिज़े कोकणाचा अनुशेष भरून काढण्याचं काम याठिकाणी नक्की आपलं सरकार करेल़ त्याचबरोबर सागरी महामार्गाचे काम सुरू आहे. मुंबई ते सिंधुदुर्गपर्यंत ग्रीनफिल्ड महामार्ग आपण करतोय. त्याच्या जीपीआरचे काम सुरू असून हा प्रकल्प कोकणासाठी वरदान ठरणार असल्याचे शिंदे म्हणाले.
- लाडक्या बहिणींना लखपती करणार
सरकारने मत्स्यला व्यवसायाला कृषी दर्जा दिल्याने फायदा होणार आह़े हाऊस बोटची संख्या वाढली पाहिज़े इथल्या बचत गटांना त्याचा फायदा झाला पाहिज़े लाडक्या बहिणींना फक्त दीड हजार ऊपये नाही तर लाडक्या बहिणींना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी लखपती लाडकी बहीण बनवण्याचे काम केल्याशिवाय आमचे सरकार स्वस्थ बसणार नाही, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.








