कनिका धिल्लनकडून निर्मिती
तापसी पन्नू हिला एक दमदार अभिनेत्री म्हणून ओळख प्राप्त झाली आहे. अभिनेत्रीने आतापर्यंत विविध छटा असलेल्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. यात थप्पड तसेच हसीन दिलरुबा यासारखे चित्रपट सामील आहेत.
हसीन दिलरुबा फ्रेंचाइजीद्वारे तापसीने स्वत:ला ओटीटीवर एक यशस्वी अभिनेत्री म्हणून प्रस्थापित पेले आहे. आता हसीन दिलरुबाचा तिसरा भाग निर्माण केला जाणार आहे. या चित्रपटाच्या कथेवर काम सुरू आहे. रानी आणि रिशूच्या प्रेमकथेत आणखी वाव असल्याचे जाणून असल्याचे उद्गार निर्माती कनिका ढिल्लों यांनी काढले आहेत.
2021 मध्ये ओटीटीवर प्रदर्शित हसीन दिलरुबा या चित्रपटात छोट्या शहराचे आकर्षण, मोहक तणाव आणि अनपेक्षित वळणं असलेल्या कहाणीद्वारे प्रेक्षकांनी मने जिंकण्यात आली होती. याचा सीक्वेल ऑगस्ट 2024 मध्ये ‘फिर आई हसीन दिलरुबा’ नावाने प्रदर्शित झाला, यात प्रेमाची गुंतागुंतीची कहाणी दाखविण्यात आली. तापसी याचबरोबर गांधारी या चित्रपटात दिसून येणार आहे. तसेच मुल्क 2 चित्रपटाचे चित्रिकरण ती सध्या करत आहे.









