वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे (युपीसीए) अनुभवी प्रशासक युधवीर सिंग यांची इंग्लंडच्या आगामी दौऱ्यासाठी भारतीय संघाचे व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली.
सध्या युपीसीएचे आजीवन सदस्य असलेले युधवीर सिंग यांनी यापूर्वी असोसिएशनचे सचिव आणि संचालक म्हणून काम पाहिले आहे. 20 जून रोजी लीड्स येथे होणाऱ्या पहिल्या सामन्यापासून भारत पाच सामन्यांची कसोटी मालिकेत इंग्लंडचा सामना करेल. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर युवा फलंदाज शुभमन गिलची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा परदेशी दौऱ्यादरम्यान गिलचा उपकर्णधार असेल.









