एका आठवड्यासाठी मोफत सेवा, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
वृत्तसंस्था/ इंदूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशमधील महत्त्वाचे शहर इंदूरला मोठी भेट दिली आहे. शनिवारपासून इंदूरमध्ये मेट्रो सेवा सुरू झाली आहे. त्यानंतर पहिल्या दिवशी महिलांनी मेट्रोमधून प्रवास केला. ही मेट्रो सेवा 6 किमीच्या मार्गावर सुरू झाली आहे. संपूर्ण प्रकल्प 31 किमी लांबीचा आहे. सध्या उद्घाटन झालेल्या मार्गावर 5 स्थानके आहेत.
मेट्रो सुरू झाल्याने शहरातील वाहतूक आणि प्रदूषण कमी होण्याची अपेक्षा आहे. उद्घाटनानंतर आता पहिल्या आठवड्यात लोक मेट्रोमध्ये मोफत प्रवास करू शकतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हर्च्युअल माध्यमातून भोपाळमधून या सेवेला हिरवा झेंडा दाखविला. इंदूर मेट्रोच्या फेज-2 चे काम जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात शनिवारपासून इंदूरमध्ये मेट्रो सुरू झाल्याचे जाहीर केले. इंदूर मेट्रोचा फक्त 6 किमीचा भाग सुरू झाला आहे. त्याला ‘यलो लाईनचा सुपर प्रायोरिटी कॉरिडॉर’ म्हटले जात आहे. यामध्ये गांधीनगर स्टेशन, सुपर कॉरिडॉर 6 स्टेशन, सुपर कॉरिडॉर 5 स्टेशन, सुपर कॉरिडॉर 4 स्टेशन आणि सुपर कॉरिडॉर 3 स्टेशन समाविष्ट आहे. या लोकार्पण सोहळ्यापूर्वी मेट्रो स्टेशन सजवण्यात आली होती. मेट्रो सुरू झाल्याने शहरातील रस्ते वाहतूक कमी होईल. प्रदूषणही कमी होण्याची अपेक्षा आहे. पहिल्या आठवड्यात लोक मेट्रोमध्ये मोफत प्रवास करू शकतील.









