कोल्हापूर / इंद्रजित गडकरी :
पारंपरिक सिगारेटप्रमाणेच आता ‘ई–सिगारेट‘ म्हणजेच इलेक्ट्रॉनिक सिगारेटचा धूर वाढत आहे. कोल्हापूरमधील तरुणांमध्ये विशेषत: शालेय मूलांमध्ये प्रचलित होत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी जिल्हा परिषदेच्या आढावा बैठिकीत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची किनार लाभलेली ही सिगारेट सुरक्षित असल्याचा चुकीचा समज तरुणांमध्ये पसरला असून, अनेक विद्यार्थी आणि नवयुवक याच्या आहारी जाताना दिसत आहेत.
ई–सिगारेट ही निकोटीनयुक्त वाफ तयार करणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे असून, ती पारंपरिक सिगारेटला ‘हेल्दी पर्याय‘ असल्याच्या जाहिरातींमुळे तरुणाईला आकर्षित करत आहे. मात्र वैद्यकीय तज्ञांच्या मते, ई–सिगारेटदेखील शरीरासाठी तितकीच घातक आहे. त्यातून निघण्राया रसायनांचा फुफ्फुसांवर दुष्परिणाम होतो, शिवाय यामुळे निकोटीनचे व्यसन अधिक तीव्र होते.
- २०१९ मध्ये ई सिगारेटवर बंदी
कोल्हापूर शहरातील महाविद्यालयीन परिसरात ई–सिगारेटचा वापर वाढत आहे. सहज मिळत असल्याचे उघड झाले आहे. सरकारने 2019 मध्ये ई–सिगारेटच्या उत्पादन, विक्री व वितरणावर बंदी घातली असली तरी ऑनलाइन माध्यमांतून किंवा लपूनछपून काही दुकानदार ही उत्पादने विकत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे फॅन्सी गॅझेट वाटले तरी ते आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. विशेषत: वयात येण्राया मुलांमध्ये याचे व्यसन लवकर लागते. हे एक ‘गेटवे प्रोडक्ट‘ आहे, ज्यामुळे पुढे इतर नशेच्या पदार्थांकडे ओढ होऊ शकते.
- पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली चिंता
खरी कॉनर्र परिसरातील माध्यमिक शाळेतील एका विद्यार्थ्यांच्या दप्तरात ई सिगारेट सापडली आहे. सोमवारी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या आढावा बैठिकीत पालकमंत्र्यांना याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांनी सांगतली असता पालकमंत्र्यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी या बाबत जनजागृती सुरू करणे गरजेचे आहे. शाळांमध्ये ई–सिगारेटचे दुष्परिणाम सांगणारे कार्यक्रम घेणे गरजेचे आहे. मात्र अजूनही व्यापक पातळीवर जनजागृतीची गरज आहे. अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन यांनी ई–सिगारेट विक्री करण्राया ठिकाणांची तपासणी करून कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. याशिवाय पालकांनीही आपल्या मुलांच्या वागणुकीकडे बारकाईने लक्ष ठेवून संवाद साधावा.
- प्रशासन, पालक, शाळा, सामाजिक संस्था यांच्या समन्वयाची गरज
एकंदरीत, कोल्हापूरमध्ये ई–सिगारेटचा वाढता वापर हा एक नव्या स्वरूपाचा सामाजिक आणि आरोग्याचा धोका ठरत आहे. सरकारच्या बंदी आदेशानंतरही ही उपकरणे विकली जात असतील, तर ही बाब अधिक गंभीर आहे. प्रशासन, पालक, शाळा आणि सामाजिक संस्था यांच्यात समन्वयानेच या नव्या व्यसनावर नियंत्रण आणता येऊ शकते.
- दोन प्रकारच्या ई सिगारेट
साधरणात: दोन प्रकारामध्ये येते त्यामध्ये ग्रीन ई–सीगारेट आणि रेड ई–सिगारेट. ग्रीन सिगारेट ही हर्बल मध्ये मोडते ज्यामध्ये निकोटीनचा वापर नसतो. ग्रीन सिगारेट वापरण्यावर कारवाई होत नाही. दुसरी रेड ई–सिगारेट ही सिगारेट वापरण्यावर बंदी आहे. यामध्ये तंबाखूजन्य पदार्थ वापरले जातात. ही सिगारेट जवळ बाळगल्यास टोबॉको अॅक्ट नूसार दंडात्मक कारवाई होते. याचा वापर देखील शरीरासाठी घातक आहे. असे डॉक्टरांचे म्हणने आहे.
- अटेंशन स्पॅन कमी होण्यासोबत होऊ शकतात गंभीर आजर
ई सिगारेट मूळे अल्टर मेंटल स्टेटस, छाती वाजणे, डोळे इरिटेट होणे, घशाचे दूखणे, नॉशिया, ओमेटींग ड्राय आय ,नैराष्य निकोटीनचे जे परिणाम शरीरावर होतात तेही परिणाम या सिगारेटमूळे होतात. ही मूल अॅडिक्शन कडे जायला लागली तर गंभीर साईड ईफेक्ट दिसतात. त्यामध्ये लिपीड निमोनिया, ब्रोनकाईटीस, क्रोनिक ईफेक्ट देखील होऊ शकतात. हार्ट अॅटक, स्ट्रोक, ब्रेन स्ट्रोक, कॅन्सर चे प्रमाण पण हल्ली वाढत आहे. शालेय मुलांना जर याची सवय लागली तर त्यांची एकाग्रता कमी होउढ शकते.
डॉ. अनिता सैबिनावर फुफ्फुसरोग तज्ञ सीपीआर हॉस्पीटल.








