विजयी शरीरसौष्ठपटू आशियाई स्पर्धेसाठी पात्र
बेळगाव : तामिळनाडू येथे झालेल्या दक्षिण विभाग आंतरराज्य शरीरसौष्ठव स्पर्धेत पदके पटकावित आशियाई स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या बेळगावच्या शरीरसौष्ठवपटूंचे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडून गौरव करण्यात आला. तामिळनाडू येथील थलपती क्लासीक 25 व्या दक्षिण विभागीय आंतरराज्य शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या शरीरसौष्ठवपटूंनी उत्तम कामगिरी केली आहे. त्यामध्ये प्रताप कालकुंद्रीकरने रौप्य, व्यंकटेश ताशिलदारने रौप्य, अफरोज ताशिलदारने कांस्य, किरण वाल्मिकीने चौथा क्रमांक पटकाविला. वरील पदक विजेत्या स्पर्धकांची दक्षिण एशियाई स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी झालेल्या शरीरसौष्ठवपटूंचे कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटनेचे पॅट्रॉन व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आयबीबीएफचे कार्यकारी सचिव अजित सिद्दन्नावर, बीडीबीबीएचे अध्यक्ष एम. गंगाधर, नागराज कोलकारसह इतर मान्यवर उपस्थित होते.









