डॉ. प्रभाकर कोरे सोसायटीच्या निपाणी शाखेचा वार्षिक दिन
बेळगाव : डॉ. प्रभाकर कोरे को-ऑप. क्रेडिट सोसायटी नि. अंकली संस्थेच्या निपाणी शाखेला सुरुवात होऊन 31 मे रोजी 13 वर्षे यशस्वीपणे पूर्ण होत आहेत. 31 मे 2012 रोजी सुरुवात झालेल्या निपाणी शाखेतून गेल्या 13 वर्षात 100 कोटींहून अधिक ठेवी संग्रहीत करण्यात आल्या आहेत. 5 कोटींहून अधिक रकमेचे कर्ज देण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष महांतेश पाटील यांनी दिली. डॉ. प्रभाकर कोरे सोसायटीच्या निपाणी शाखेच्या स्वत:च्या वास्तुमध्ये स्थलांतर व वार्षिक दिन कार्यक्रम नुकताच झाला. याप्रसंगी अध्यक्ष पाटील बोलत होते. निपाणी शाखेने मध्यम कर्ज, जलउपसा योजना उपकरणे खरेदीसाठी कर्ज, वाहन कर्ज, गृहकर्ज, लघु व मोठ्या उद्योगांसाठी कर्ज अल्प व्याजदरात वितरण केले आहे. ई-स्टॅम्प, आरटीसी वितरण, जीवन विमा, आरोग्य विमा, सामान्य विमा, ई-तिकीट बुकिंग यासारखे व्यवहार केले आहेत. संस्थेच्या 55 शाखांपैकी 7 शाखा स्वत:च्या वास्तुमध्ये कार्यरत आहेत.
पुढील दिवसांत सर्व शाखा स्वत:च्या इमारतीत सुरू करण्याचा संस्थेचा उद्देश आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात शाखेला 67.13 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. 4 कोटी 60 लाख रुपये खर्चातून अशोकनगरात वास्तू खरेदी करून येथे निपाणी शाखेचे स्थलांतर करण्यात आले आहे. डॉ. प्रभाकर कोरे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या को-ऑप. क्रेडिट सोसायटीची भरभराट होत राहो. निपाणी शहर व परिसरातील सोसायटीचे सदस्य, ठेवीदार, ग्राहकांचे सोसायटीकडून हित होवो, अशी सदिच्छाही अध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केली. नूतन वास्तू उद्घाटन समारंभास उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले वीरुपाक्षलिंग समाधीमठ निपाणीचे म.नि.प्र. प्राणलिंग महास्वामी यांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या. उपाध्यक्ष सिद्धगौडा मगदूम, निपाणी शाखा अध्यक्ष प्रवीण बागेवाडी, संचालक अण्णासाहेब संकेश्वरी, बसनगौडा आसंगी, सुकुमार चौगुले, पिंटू हिरेकुरबर, अमित जाधव, अनिल पाटील, अशोक चौगला, श्रीकांत उमराणे, विवेकानंद कमते, रवींद्र शेट्टी, राजू गुंदेशाह, मिलिंद चौगला, अशोक राऊत, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र करोशी, सदस्य व कर्मचारी तसेच हितचिंतक समारंभाला उपस्थित होते.









