बेळगाव : गोवा-कळंगुट येथील बडोदा फुटबॉल अकादमी आयोजित निमंत्रितांच्या बीएएफ चषक 14 वर्षांखालील आंतरक्लब फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एमएसडीएफ बेळगाव संघाने सुपर 30 कांडोलीम संघाचा 7-3 अशा गोलफरकाने पराभव करुन बीएएफ चषक पटकाविला. कळंगुट येथे खेळविण्यात आलेल्या स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यात एमएसडीएफ संघाने बीएफएयुएसआय संघाचा 12-5 अशा गोलफरकाने पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात एमएसडीएफच्या हुसेन जमादारने 3, 11, 17, 19 व्या मिनिटाला सलग चार गोल केले. अबुजार तिगडीने 4 व 13 व्या मिनिटाला दोन गोल केले. रियान सनदीने 9 व 15 व्या मिनिटाला दोन गोल केले. तर चैतन्य नाईकने 32 व्या, अदानने 27 व्या, लोयाने 34 व्या तर कोराने 35 व्या मिनिटाला गोल केले. बीएफएतर्फे रॉस्टनने 3 तर रॉयन डिसोजाने 2 गोल केले.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सुपर 30 कांडोलीमने सुपर गोवा संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. रॉयन डिसोजाने एकमेव गोल केला. अंतिम सामन्यात एमएसडीएफने सुपर 30 कांडोलीमचा 7-3 अशा गोलफरकाने पराभव केला. त्यामध्ये 13 व 21 व्या मिनिटाला हुसेन जमादारने दोन, कोरोने 7 व 16 व्या मिनिटाला तर लोयाने 9 व 17 व्या मिनिटाला गोल दोन करुन संघाला 6-0 ची आघाडी मिळवून दिली. 19 व 23 व्या मिनिटाला सुपर 30 संघाच्या रॉयन डिसोजाने दोन गोल केले तर 28 व्या मिनिटाला रॉस्टन सॅबेस्टीनने एक गोल करुन 3-6 अशी आघाडी कमी केली. 38 व्या मिनिटाला हुसेनच्या पासवर चैतन्य नाईकने सातवा गोल करुन 7-3 अशी आघाडी मिळविली. सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या एमएसडीएफ तर उपविजेत्या सुपर 30 कांडोलीम संघाला चषक, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. बेळगावच्या संघात रियान सय्यद, चैतन्य नाईक, हुसेन जमादार, आर्य कंग्राळकर, उजेफा अथणी, हसन जमादार, अबुझार तिगडी, श्रवण बसुर्तेकर, अदान, विन्सन, कोरो, लोया आदी खेळाडूंचा समावेश आहे. या संघाला मानस नाईक यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









