वृत्तसंस्था / लखनौ
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतला रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर विरुद्ध शेवटच्या आयपीएल सामन्यात षटकांची गती न राखता आल्याबद्दल 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
इम्पॅक्ट प्लेअरसह उर्वरित प्लेइंग इलेव्हनला मंगळवारी झालेल्या उल्लंघनासाठी 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. निर्धारित वेळेत षटकांची गती न राखता आल्याने आयपीएल आचारसंहितेनुसार हा त्यांच्या संघाचा हंगामातील तिसरा गुन्हा असल्याने ऋषभ पंतला 30 लाख रुपयांचा दंड करण्यात आला, असे आयपीएलच्या प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. इम्पॅक्ट प्लेअरसह प्लेइंग इलेव्हनच्या उर्वरित सदस्यांना प्रत्येकी 12 लाख रुपये किंवा त्यांच्या संबंधित सामन्यातील 50 टक्के रक्कम जे कमी असेल ते दंड म्हणून ठोठावण्यात आला. पंतने 61 चेंडूत नाबाद 118 धावा केल्या. पण त्याच्या संघाला विजय मिळू शकला नाही.









