मयुर चराटकर
बांदा
मुंबई गोवा महामार्गावरील इन्सुली कुडवटेंब येथे महामार्ग खचून खड्डा पडला. सदरच्या खड्डामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. सदरचा महामार्ग दहा बारा वर्षांपूर्वी वाहतुकीस सुरु झाला असुन महामार्ग खचल्याने कामाच्या दर्जाबद्दल प्रश्न उभा राहत आहे. सद्यस्थितीत सदरचा खड्डा वाढत चालला असुन वाहतुकीच्या सुरक्षेच्या दृष्टीने महामार्ग विभागाने सावधानता घेणे गरजेचे आहे. तसेच झाराप ते गोवा पत्रादेवी मार्गाची पाहणी करून ज्या ठिकाणी धोकादायक आहे त्या ठिकाणी फलक लावणे गरजेचे आहे.









