कोल्हापूर :
महाराष्ट्र पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी आज (दि. २२ मे) जाहीर करण्यात आली. या बदल्यांत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती ठाणे शहराचे पोलिस उपायुक्त म्हणून करण्यात आली आहे.
त्यांच्या जागी योगेश गुप्ता यांची कोल्हापूर जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.








