क्वेटा
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात आत्मघाती हल्ला झाला आहे. स्कुलबसला लक्ष्य करत करण्यात आलेल्या आत्मघाती कार बॉम्बस्फोटात 4 मुलांचा मृत्यू झाला असून 38 जण जखमी झाले आहे. या स्फोटातील जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमींना क्वेटा आणि कराची येथील रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी या हल्ल्याची निंदा केली आहे.









