एमसीए अध्यक्ष ऱोहित पवार : 4 जून पासून पुण्यात रंगणार एमपीएल स्पर्धेचा थरार!
प्रतिनिधी/ कोल्हापूर
महाराष्ट्र प्रीमियर लीगमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य कुटुंबातील अनेक नवोदित खेळाडूंना योग्य वेळी संधी मिळत आहे. या स्पर्धेमुळे त्यांच्यासाठी भविष्यातील अनेक दरवाजे उघडले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे (एमसीए) राज्यातील प्रत्येक जिह्याला क्रिकेटच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रत्येकी 75 लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. कोल्हापूर जिह्यात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी, अनेक नवीन प्रतिभान खेळाडू निर्माण करण्यासाठी एमसीए सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिह्यात क्रिकेट सुविधांचा विकास करून महाराष्ट्र क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी एमसीए सदैव कटिबद्ध असल्याचे संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
या प्रसंगी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले, सचिव अॅङ कमलेश पिसाळ, अपेक्स कौन्सिल सदस्य श्री. सुशील शेवाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य जोशी, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले, उपाध्यक्ष अभिजीत भोसले उपस्थित होते.
दरम्यान, 4 जूनपासून पुण्यातील एमसीएच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर महाराष्ट्र प्रीमियर लीग व वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धांचा थरार रंगणार आहे. यामध्ये पहिल्या हंगामातील उपविजेते पीबीजी कोल्हापूर टस्कर्स या संघाचाही समावेश आहे.
पवार म्हणाले की, महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धेमुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या गुणवान क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावर येण्यासाठी संधी मिळणार असून या स्पर्धेमुळे भविष्यात भारतालाही गुणवान क्रिकेटपटू मिळणार आहेत. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली त्यांची सर्व कमिटी कोल्हापूर क्रिकेटच्या विकासासाठी उत्तम प्रयत्न करत आहेत, या गोष्टीचा मनस्वी आनंद आहे. आमचा दृढ विश्वास आहे की येत्या काळात एमपीएल व डब्ल्यूएमपीएलच्या माध्यमातून कोल्हापूर जिह्यातील अधिकाधिक खेळाडू महाराष्ट्राकडून व पुढे जाऊन देशासाठी खेळतील.
कोल्हापूरात विभागीय अकादमीसाठी प्रयत्नशील
महाराष्ट्र क्रिकेट संघटना आगामी हंगामात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या धर्तीवर स्वत:ची अकादमी सुरु करणार असून ही अकादमी अजय शिर्के यांच्या नावाने पुण्यातच सुरु करण्यात येईल. त्यानंतर महाराष्ट्रात चार विभागीय अकादमी सुरु करण्यात येणार आहे. तसेच कोल्हापूरमध्ये क्रिकेटसाठी जागा देण्यासाठी सकारात्मक असून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा भविष्यात या जागेवर विभागीय अकादमी सुरू करण्याचा मानस आहे.
एमपीएलमध्ये 6 तर डब्ल्यूएमपीएलमध्ये 4 संघाचा सहभाग
या हंगामात एमपीएल मध्ये 6 संघ आणि डब्लूएमपीएल मध्ये 4 संघ सहभागी झाले असून, ही स्पर्धा येत्या मे व जून 2025 मध्ये एमसीए गहुंजे इंटरनॅशनल स्टेडियम, पुणे येथे खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण जिओ हॉटस्टार व स्टार स्पोर्ट्स 2 या वाहिन्यांवर करण्यात येणार आहे, ज्यामुळे ही स्पर्धा राज्यासह संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.
एमपीएल 2025 सहभागी संघ: ए पुणेरी बाप्पा, झ्ँउ कोल्हापूर टस्कर्स, रत्नागिरी जेट्स, ईगल नाशिक टायटन्स, सातारा वॉरियर्स, रायगड रॉयल्स.
डब्लूएमपीएल 2025 सहभागी संघ : पुणे वॉरियर्स, रत्नागिरी जेट्स, पुष्प सोलापूर, रायगड रॉयल्स.









