2025-26 साठी कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केली शक्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वर्ष 2025-26 या आर्थिक वर्षात देशातील कृषी क्षेत्राचा विकास दर 3.5 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी येत्या खरीपाच्या पिकाची लागवड करण्यापूर्वी शेतकऱ्यांना नवीन तंत्रांबद्दल शिक्षित करण्यासाठी 15 दिवसांच्या अखिल भारतीय मोहिमेची घोषणा केली आहे.
चौहान म्हणाले, ‘जागतिक स्तरावर 1.5-2 टक्के कृषी विकास चांगला मानला जातो. पुढील वर्षी (2025-26) देखील आम्हाला 3-3.5 टक्के वाढ अपेक्षित आहे. भारतीय हवामान खात्याने यावर्षी सामान्यपेक्षा चांगला मान्सून येण्याचा अंदाज वर्तवला आहे. 27 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे मान्सून सामान्यपेक्षा पाच दिवस आधी येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सिंधू करारबद्दल शेतकऱ्यांचे निवेदन
कृषी मंत्री चौहान यांनी आज सांगितले की माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 1960 च्या दशकात पाकिस्तानसोबत सिंधू पाणी करारावर स्वाक्षरी केली होती. शेतकऱ्यांच्या एका गटाने केंद्र सरकारला निवेदन सादर केले ज्यामध्ये पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार कायमचा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. हे पाणी उत्तर भारतातील शेतकऱ्यांसाठी वापरण्यास उपयुक्त ठरु
शकते.









