नवे शुल्क कळल्यावर व्हाल चकित
बॉलिवूड स्टार श्रद्धा कपूर सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचा मागील चित्रपट स्त्राr 2 हा हिट ठरला आणि तिच्या अभिनयाचेही कौतुक झाले. याचबरोबर या चित्रपटातील राजकुमार रावच्या अभिनयाची प्रशंसा झाली होती.
या चित्रपटाच्या यशानंतर राजकुमारने स्वत:च्या शुल्कात 5 कोटी रुपयांची वाढ केली आहे. तर श्रद्धा कपूरने देखील स्वत:च्या शुल्कात वाढ केल्याचे समोर आले आहे. श्रद्धा सध्या एकता कपूरसोबत एका चित्रपटात काम करत असून याकरता ती 17 कोटी रुपयांचे शुल्क आकारणार आहे.
श्रद्धा कपूर ही राही अनिल बर्वे यांच्याकडून दिग्दर्शित आगामी हाय-कॉन्सेप्ट थ्रिलरसाठी एकता कपूरसोबत बोलणी करत आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण लवकरच सुरू होणार आहे. श्रद्धा कपूर ही आता सर्वाधिक शुल्क आकारणारी बॉलिवूड अभिनेत्री ठरू शकते. सध्या श्रद्धापेक्षा केवळ दीपिका पदूकोनच अधिक शुल्क आकारते. यापूर्वी राजकुमार रावने स्त्राr 2 या चित्रपटाच्या यशानंतर स्वत:चे शुल्क 5 कोटी रुपयांनी वाढविले होते









