चिपळूण :
शहरातील नाले व गटारे सफाई आता अंतिम टप्यात आली आहे. शहरात पूर येऊ नये म्हणून कर्मचारी स्वतः उतरून तर काही ठिकाणी पोकलेन, जेसीबीच्या सहाय्याने ही सफाई केली जात आहे. शहरात १७ किमी लांबीचे ४३ नाले, परे आहेत. तसेच लहान-मोठी ७० गटारे आहेत. गटारांची साफसफाई नेहमीच केली जाते.
मात्र पावसाळ्यात डोंगर भागासह अन्य ठिकाणाहून येणारे पाणी शहरात न अडता ते थेट वाशिष्ठी व शिवनदीत वाहून जावे यासाठी नाल्यांच्या व त्याचबरोबर गटारांच्या सफाईचे काम मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे, आरोग्य निरीक्षक महेश जाधव, सुजीत जाधव, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल महिन्यातच सुरू करण्यात आले आहे. यासाठी एक पोकलेन, जेसीबी, डंपर व कर्मचारी अशी यंत्रणा लावण्यात आली आहे. ८० टक्के मोठ्या नाल्याची सफाई पूर्ण झाली








