नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्याकडून प्रभागात वाटप
बेळगाव : महानगरपालिकेच्या निधीतून अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसी विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणारे लॅपटॉप स्थानिक नगरसेवकांकडे देण्यात आले होते. त्यामुळे आता स्थानिक नगरसेवकांकडून आपापल्या प्रभागातील एससी-एसटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरण केले जात आहे. नुकतेच नगरसेविका वैशाली सिद्धार्थ भातकांडे यांनी आपल्या प्रभागातील प्रतीक्षा अशोक पाटील, रा. संभाजी गल्ली या विद्यार्थिनीला लॅपटॉपचे वितरण केले. महानगरपालिकेच्या पुढाकारातून एससी-एसटी आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरण केले जात आहे. यासाठी स्थानिक नगरसेवकांकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रभाग क्र. 10 च्या नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्याकडेदेखील मनपाकडून लॅपटॉप वितरित करण्यासाठी देण्यात आला होता. त्यानुसार त्यांनी ओबीसी विद्यार्थिनी प्रतीक्षा पाटील हिला लॅपटॉप देऊ केला आहे.









