खानापूर : खानापूर तालुका कुस्तीगीर संघटना आयोजित भव्य कुस्ती मैदान रविवार दि. 18 रोजी दुपारी 3 वाजता मलप्रभा क्रीडांगण जांबोटी क्रॉस खानापूर येथे होणार असून त्याची तयारी अंतिम टप्यात आली आहे. या आखाड्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती बेळगाव जिल्ह्यात प्रथमच कुस्ती मैदानात सहभागी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ व भारत केसरी सोनू कुमार हरियाणा येत आहेत. पृथ्वीराज मोहोळचे आव्हान भारत केसरी सोनू हरियाणाने स्विकारून प्रथमच तो खानापूरला येत आहे. द्वितीय क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी शुभम सिदनाळे वि. हिमाचल केसरी पवन कुमार यांच्यात लढत होणार आहे. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे वि. उपमहाराष्ट्र केसरी संदीप मोटे, चौथ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक चॅम्पियन शिवय्या पुजारी व कोल्हापूरचा ओम माने यांच्यात, पाचव्या क्रमांकाची कुस्ती शिवा दड्डी व सुनील करवते, सहाव्या क्रमांकाची कुस्ती प्रेम कंग्राळी व संजू इंगळगी यांच्यात,
सातव्या क्रमांकाची कुस्ती विक्रम शिनोळी व बस्सू जगदाळे, आठव्या क्रमांकाची कुस्ती पृथ्वीराज पाटील व गिरीश चिक्कबागेवाडी, नवव्या क्रमांकाची कुस्ती पवन चिक्कदिनकोप्प व श्रीनाथ ढेकोळे, दहाव्या क्रमांकाची कुस्ती निखिल कंग्राळी व सिद्धू धारवाड, विनायक यळ्ळूर व राजू गंदीगवाड, सुमित कडोली व भूमिपुत्र मुतगा, हनुमंत गंदिगवाड व ओमकार राशिवडे, हर्ष कंग्राळी व उमेश शिरगुपी, सिद्धांत तीर्थकुंडे व केशव सांबरा आदीसह 50 हून अधिक कुस्त्या होणार आहेत. महिलांच्या कुस्त्यामध्ये शिवानी वड्डेबैल व वैष्णवी कुसमळी, ऋतुजा वडगाव व भक्ती मोदेकोप यांच्यात होणार आहेत. मेंढ्याची कुस्ती पंकज चापगाव व रामदास काकती, महेश तीर्थकुंडे व काशिलिंग जमखंडी यांच्यात होणार आहे. आकर्षक कुस्त्यामध्ये कर्नाटक चॅम्पियन पार्थ पाटील कंग्राळी व संजू दावणगिरी, प्रथमेश हट्टीकर व सुरेश लंगोटी, रिदांत मजगाव व स्वराज्य सावगाव यांच्यात होणार आहे. आखाडा समारंभाचे अध्यक्ष आमदार विठ्ठल हलगेकर राहणार आहेत. आखाड्याला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष हणमंत गुरव व अन्य पदाधिकाऱ्यांनी केले आहे.









