13 पदकांची कमाई
बेळगाव : बेंगळूर येथे झालेल्या विभागीय स्केटिंग स्पर्धा व गोवा येथे झालेल्या 7 व्या खुल्या राज्यस्तरीय स्पर्धेत बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेचे स्केटर्सनी चमकदार कामगिरी करीत 8 सुवर्ण, 3 रौप्य व 2 कांस्यसह 13 पदके पटकावित घवघवीत यश संपादन केले. विजेते स्पर्धक खालील प्रमाणे- केंद्रीय विद्यालय विभागीय स्केटिंग स्पर्धेत विजेते स्केटर्स-सत्यम पाटीलने 2 सुवर्ण, कुलदीप बिर्जेने 2 सुवर्ण, सर्वेश पाटीलने 1 सुवर्ण, 1 रौप्य, प्रांजल पाटीलने 1 सुवर्ण, 1 रौप्य पटकाविले. खुल्या राज्यस्तरीय स्पर्धेत विजेते स्केटर्स-जान्हवी तेंडुलकरने 2 सुवर्ण, आरशान माडीवालेने 1 रौप्य, 1 कांस्य, अमिषा वेर्णेकर 1 कांस्य पटकाविले. वरील सर्व स्केटर्सना प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, विठ्ठल गंगणे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या सर्वांना डॉ प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर यांचे प्रोत्साहन मिळत आहे









