चेन्नई :
ईडीने शुक्रवारी टीएएसएमएसीशी निगडित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तामिळनाडूत पुन्हा छापे टाकले आहेत. टीएएसएमएसी अधिकारी आणि एजंटांशी निगडित सुमारे 10 ठिकाणांवर पीएमएलए अंतर्गत छापे टाकण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. टीएएसएमएसी ही राज्य सरकारची संस्था असून तिचा राज्यातील मद्य व्यापाराचा एकाधिकार आहे.









