दिल्ली आणि आंध्र येथील दोन सरकारी प्रकल्प हाती
वृत्तसस्था/ नवी दिल्ली
अभियांत्रिकी आणि पायाभूत सेवा क्षेत्रात कार्यरत असणारी दिग्गज कंपनी लार्सन अॅण्डट टुब्रोला जवळपास 5000 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. कंपनीला नवी दिल्ली आणि आंध्र प्रदेशमधील सरकारकडून मुख्य प्रकल्पासाठी काम मिळाले आहे अशी माहिती कंपनीने पत्रकार परिषदेमधून दिली आहे. कंपनीला राष्ट्रीय राजधानीत कॉमन सेंट्रल सेक्रेटरीएट बिल्डिंग 6 आणि 7 च्या बांधकामासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) ऑर्डर मिळाली आहे. कंपनीने सांगितले की या प्रकल्पात दोन इमारतींचे बांधकाम समाविष्ट आहे आणि प्रत्येक इमारतीमध्ये एक तळघर, दोन पोडियम, एक वरचा तळमजला आणि सहा अतिरिक्त मजले आहेत. कामाच्या व्याप्तीमध्ये सिव्हिल स्ट्रक्चर्स, फिनिशिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंग सेवा, बाह्य विकास आणि पाच वर्षांचे ऑपरेशन आणि देखभाल यांचा समावेश आहे.
आंध्र प्रदेश सरकारकडून राज्य विधानसभेची इमारत बांधण्यासाठी डिझाइन आणि बांधकाम कंत्राट मिळवले. कंपनीने म्हटले आहे की या प्रकल्पात एक तळमजला आणि तीन अतिरिक्त मजल्यांच्या इमारतींचे बांधकाम समाविष्ट आहे. हे दोन्ही प्रकल्प 18 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे. ही ऑर्डर एल अँड टीच्या ‘मोठ्या’ श्रेणीत येते, जिची किंमत कंपनी 2,500 कोटी ते 5,000 कोटी रुपयांच्या दरम्यान असते.









