कोल्हापूर :
शृंगार होता संस्काराचा…
अंगार होता हिंदवी स्वराज्याचा…
शत्रूही नतमस्तक होई जेथे…
असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा…
हिदू धर्मरक्षक, शुरवीर छावा, महान योद्धा यासह अनेक विशेषणांनी संबोधल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची जयंती बुधवार 14 रोजी साजरी करण्यात येत आहे. सकाळी 10 च्या सुमारात मोठ्या थाटात संभाजी महाराजांचा जन्मकाळ सोहळा साजरा केला जाईल. पापाची तिकटी येथील संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ लोकांना सायंकाळी 7 वाजता प्रसादाचे वाटप करण्यात येईल. रविवार 18 रोजी संयुक्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्यावतीने बाबा जरगनगरातील कृष्ण सरस्वती मंगल कार्यालयाजवळून संभाजी महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात येईल.
- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्सव समिती…
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्सव समितीच्या वतीने पापाची तिकटी येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाजवळ छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात येणार आहे. सकाळी संभाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक व जलाभिषेक करण्यात येईल. त्यानंतर जन्मकाळ सोहळा साजरा कऊन स्मारकासमोरच उभारलेल्या मोठ्या मंडपात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येईल. दुपारी 4 पर्यंत हे शिबिर सुऊ राहिल. सायंकाळी 7 वाजता स्मारकाजवळच लोकांना प्रसादाचे वाटप करण्यात येईल.
- छत्रपती 14 मित्र मंडळ…
बिंदू चौकात संभाजी महाराज जयंती सोहळा साजरा करण्यासाठी छत्रपती 14 मित्र मंडळाच्या वतीने 21 फुटी संभाजी महाराजांचा पुतळा विराजमान करण्यात आला आहे. फायबरपासून साकारलेल्या या पुतळ्याजवळ मंगळवारी रात्री संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा छावा हा चित्र मोठ्या क्रीन दाखवण्यात आला. बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास बिंदू चौक परिसरातील महिलांच्या उपस्थितीत संभाजी महाराजांचा जन्मकाळ सोहळा साजरा करण्यात येईल. तसेच सायंकाळी सात वाजता बिंदू चौकातच शाहीरी पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित केला जाईल.
- संयुक्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती…
बाबा जरगनगरातील संयुक्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्यावतीने कृष्ण सरस्वती मंगल कार्यालयासमोरील 100 फुटी रोडवर संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात येईल. सकाळी जन्मकाळ सोहळा केल्यानंतर चार गटांमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले जाईल. गुऊवार 15 रोजी फुड फेस्टीवल व होम मिनिस्टर, शुक्रवार 16 रोजी ग्रामिण वादकांसाठी हलगी वादन स्पर्धा, आणि शनिवारी 17 रोजी भक्ती–शक्तीचा संगम हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. रविवारी 18 रोजी संभाजी महाराजांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात येईल, असे उत्सव समितीचे अध्यक्ष पंकज पाटील यांनी सांगितले.








