पालिकेने तत्काळ खड्डा बुजवावा ; नागरिकांची मागणी
सावंतवाडी -प्रतिनिधी
सावंतवाडी शहरातील सालईवाडा परिसरातील निंबाळकर पीर जवळ असलेल्या रस्त्यावरील खड्डा माती घालून बुजवल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. या रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ जास्त असल्याने एखादा अपघात झाल्यास नगरपालिका प्रशासन त्याला जबाबदार असेल असे स्थानिकांचे म्हणणे आहे. शहरांमध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारे पाईपलाईनचे काम करून खोदलेले खड्डे मातीने बुजवले जातात. मात्र , त्यानंतर त्या खड्ड्यामुळे अपघात होण्याची अनेक प्रकरणे झाली आहेत. तरी लवकरात लवकर नगरपालिका प्रशासनाने हा खड्डा बुजवून रस्ता पूर्ववत करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.









