वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सचिन तेंडुलकर त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असताना त्याचा वारसदार म्हणून विराट कोहली उभरला होता आणि सोमवारी जेव्हा विराटने त्याच्या कसोटी कारकिर्दीचा निरोप घेतला तेव्हा ‘मास्टर ब्लास्टर’ने एका धाग्याच्या आठवणीला उजाळा दिला, जो त्यांच्यातील बंधनाचा अतूट भाग बनला.
12 वर्षांपूर्वी जेव्हा तेंडुलकर मुंबईत त्याची शेवटची कसोटी खेळत होता तेव्हा 24 वर्षांचा कोहली त्याचा आदर्श असलेल्या या खेळाडूकडे आला होता. ‘तुझ्या दिवंगत वडिलांचा एक धागा तू मला भेट देऊ केलास. तो स्वीकारणे माझ्यासाठी खूप वैयक्तिक होते, परंतु ते हृदयस्पर्शी होते आणि तेव्हापासून माझ्या आठवणीत राहिले आहे’, असे तेंडुलकरने ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. ‘माझ्याकडे बदल्यात देण्यासाठी धागा नसला, तरी माझे मनापासून कौतुक आणि शुभेच्छा तुझ्यासोबत आहेस. विराट, तुझा खरा वारसा असंख्य तऊण क्रिकेटपटूंना हा खेळ स्वीकारण्याची प्रेरणा देण्यात आहे’, असेही तेंडुलकरने म्हटले आहे.









