32 विमानतळांवरून हटला नोटॅम
भारत आणि पाकिस्ता यांच्यातील तणाव कमी होणे आणि शस्त्रसंधी होताच भारताने स्वत:चे हवाईक्षेत्र पूर्णपणे खुले केले आहे. याचबरोबर आता कुठल्याही निर्बंधांशिवाय विमानवाहतूक सुरू होणार आहे. भारतच नव्हे तर पाकिस्तानकडूनही स्वत:चे हवाईक्षेत्र खुले करण्यात आले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून 23 मेपर्यंत हवाईक्षेत्र बंद करण्यात आले होते.
भारती वायुदलाच्या निर्देशांच्या अंतर्गत आता कमर्शियल फ्लाइट्ससाठी भारतीय हवाईक्षेत्र पूर्णपणे खुले करण्यात आले आहे. याचबरोबर पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान ज्या विमानतळांना बंद करण्यात आले होत, त्यांना संचालनासाठी खुले करण्याचा आदेश देण्यात आला आहे. 32 विमानतळांसाठी जारी नोटॅम (नोटीस टू एअरमॅन) रद्द करण्यात आला आहे.
भारत आणि पाकिस्तानदरम्यान शस्त्रसंधीनंतर हा निर्णय पूर्वीपासून प्रतिबंधित सर्व क्षेत्रांमध्ये सामान्य नागरीउ•ाण पूर्ववत होत असल्याचे दर्शवितो. या पावलामुळे हवाई वाहतूक सुरळीत होणार असून देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय दोन्ही एअरलाइन्सना लाभ होण्याची अपेक्षा आहे. तणावादरम्यान हवाईक्षेत्र बंद राहिल्याने या कंपन्यांना मोठे नुकसान होत होते.
एअरलाइन्सकडून प्रवाशांना माहिती
भारतीय हवाईक्षेत्र आणि विमानतळं खुले करण्याच्या निर्णयासंबंधी विविध एअरलाइन्सनी स्वत:च्या प्रवाशांकरता मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. इंडिगो एअरलाइन्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत भारत सरकारच्या नव्या निर्देशांच्या अंतर्गत विमानतळे संचालनासाठी खुले करण्यात आली असून आम्ही पूर्वी बंद राहिलेल्या मार्गांवर हळूहळू प्रवासी-सेवा सुरू करत आहोत, असे म्हटले आहे.
चंदीगड विमानतळावरील सेवा सुरू
याचबरोबर चंदीगड विमानतळाकडून सेवा आणि फ्लाइट्स तत्काळ प्रभावाने सुरू करण्यास सज्ज असल्याचे म्हटले गेले आहे. तसेच प्रवाशांना संबंधित एअरलाइन्सच्या वेळापत्रकाची पडताळणी करत राहण्याची सूचना विमानतळ व्यवस्थापनाकडून करण्यात आली आहे.
पाकिस्तानचे हवाईक्षेत्रही खुले
भारत आणि पाकिस्तानदरम्यान आता शस्त्रसंधी लागू झाली आहे. याचमुळे केवळ भारत नव्हे तर पाकिस्तानने देखील स्वत:चे हवाईक्षेत्र खुले केले आहे. आता देशातील सर्व विमानतळे पूर्णपणे संचालित असून नियमित विमान उ•ाणांसाठी उपलब्ध असल्याचे पाकिस्तानच्या विमानतळ प्राधिकरणाने सांगितले आहे.









