डॉ. सतीश जारकीहोळी टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : भातकांडे स्पोर्ट्स अकादमी व जिल्हा वाल्मिकी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. सतीश जारकीहोळी राज्यस्तरीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात झारा संघाने चारमिनार संघाचा, अलरझाने श्री इलेव्हनचा, आर.बी. 20 इलेव्हनने राजराजचा तर अवनी स्पोर्ट्सने बालाजी स्पोर्ट्सचा पराभव करुन पुढील फेरीत प्रवेश केला. दर्शन पाटील, साकीब अंडेवाले, स्वयम अप्पण्णावर, अभिषेक पाटील यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सरदार्स मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात झारा इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडी बाद 108 धावा केल्या. त्यात दर्शन पाटीलने 3 षटकार, 4 चौकारांसह 17 चेंडूत 44, इराण्णा बुर्जीने 3 षटकार, 2 चौकारांसह 27, अझहरने 11 धावा केल्या. चारमिनारतर्फे इम्रान तालिकुट्टीने 15 धावांत 3 तर मतीन व फयाझ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना चारमिनारने 8 षटकात 9 गडी बाद 74 धावा केल्या. त्यात मतीन भोजगारने 4 षटकार, 4 चौकारांसह 18 चेंडूत 44, अझहर गवसने 13 धावा केल्या. झारातर्फे अब्बास हुद्दार व सिद्धाप्पा पुजारी यांनी प्रत्येकी 3 तर विनोदने 1 गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात अलरझा संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडी बाद 70 धावा केल्या. त्यात समीर पठाणने 25 व साकिब अंडेवालेने 19 धावा केल्या. श्री इलेव्हनतर्फे विशाल व मानस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना श्री इलेव्हनचा डाव 7.2 षटकात 59 धावांत आटोपला. विजयने 2 षटकार, 4 चौकारांसह 34 धावा केल्या. अलरझातर्फे साकिब अंडेवालेने 5 धावांत 4, अवी सालापूर व परवेज यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तिसऱ्या सामन्यात आर.बी. 20 संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडी बाद 89 धावा केल्या. त्यात अजिंक्य व राहूल यांनी प्रत्येकी 15, स्वयम अप्पण्णावर 13 तर विशाल गौरगोंडाने 11 धावा केल्या. रामराजतर्फे संदिप चव्हाणने 22 धावांत 3, यश हावळाण्णाचेने 2 तर अभिजित पाटीलने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना रामराज संघाचा डाव 7.5 षटकात 45 धावांत आटोपला. त्यात संदीप चव्हाणने 16 धावा केल्या. आर.बी. 20 तर्फे समीर येळ्ळूरकरने 2 धावांत 5, स्वयम अप्पण्णावरने 11 धावांत 3, अक्षय पाटीलने 2 तर आर्यनने 1 गडी बाद केला.
चौथ्या सामन्यात बालाजी स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडी बाद 67 धावा केल्या. त्यात रोहित पोरवालने 9 चौकारांसह 52 धावा करुन अर्धशतक झळकाविले. अवनी स्पोर्ट्सतर्फे रोहित दोडवाडने 12 धावांत 2 तर शिवाजी पाटीलने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना अवनी स्पोर्ट्सने 5.4 षटकात 2 गडी बाद 72 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात अभिषेक पाटीलने 4 षटकार, 1 चौकारासह 11 चेंडूत 34, प्रणय शेट्टीने 2 षटकार, 1 चौकारासह 20 तर सुनील सक्रीने 13 धावा केल्या. बालाजीतर्फे अक्षय जैन व रवी राजपुरोहित यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे मल्लेश चौगुले, अश्विन शिंदे, यल्लाप्पा पाटील, मिलिंद भातकांडे, एस. बी. बुद्धिहाळ, भैरेगौडा पाटील, झहुर हाजी, रोहित पोरवाल, प्रसन्न शेट्टी, जे. एस. देवडी, संजू नाईक यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देण्यात आला.









